वणी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 4 लाखांच्या वरील दागिण्यावर हात साफ...

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत चिखलगाव परिसरात चोरट्यांनी डॉक्टर च्या घरात चोरी करत सोन्या चांदीचे दागिने, व रोख रक्कम चोरून नेले. 17 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोढाले ले आउट, चिखलगाव येथे ही घटना घडली. हेमंत पुरुषोत्तम देठे (वय 37, रा. बोढाले ले आउट, चिखलगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

चोरट्यांनी चिखलगाव परिसरातील बोढाले ले-आऊट येथे एका घरातून सोन्याचे दोन मंगळसुत्र 20 ग्रॅम किमंत अंदाजे 1,60000/-रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅम असे एकुण 10 ग्रॅम 80000/-रुपये, लहान मुलीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 2 ग्रॅम एकुण 4 ग्रॅम 32000/-रुपये, सोन्याचा गोप ग्रॅम किंमत अंदाजे 32000/-रुपये, चांदीचे चाळ 6 नग किमंत अंदाजे 10000/-रुपये व नगदी 135000/-रुपये, असा एकुण 4,49000/-रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. कलम 331(4), 305(a) बि एन एस नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच तूर्तास प्रभार असलेले पोलीस निरीक्षक संजय सोळंखे, यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे करत आहेत.
वणी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 4 लाखांच्या वरील दागिण्यावर हात साफ... वणी मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 4 लाखांच्या वरील दागिण्यावर हात साफ... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.