सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शिवसेना मारेगाव तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी ना.संजू भाऊ राठोड 'मंत्री' व्हावे यासाठी आपल्या परिवारासह अयोध्यामध्ये जाऊन साकडे घातले होते. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत संजय राठोड हे विजयी झाले. या विजयानंतर महायुतीकडून त्यांना मंत्री पद मिळाले ते आता शासन दरबारी उत्तमरित्या आपला कार्यभार सांभाळत आहे. मात्र, याकरिता प्रभू श्री रामचंद्राची कृपा झाली, आपण बोललो होतो की, साहेब मंत्री झाले तर लाडक्या बहिणींना स्वखर्चाने देवदर्शनाला घेऊन जाणार आणि साहेब मंत्री झाले मागणी पूर्ण झाली म्हणून शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांनी स्वखर्चातून लाडक्या बहीनींना अयोध्या सह इतरही तिर्थयात्रा दि. 8 एप्रिल 2025 पासून सुरु केली होती. यात 72 महिला, 8 पुरुष आणि 4 लहान मुले होती. दरम्यान अकरा ठिकाणी देव दर्शन केले. एकूणच 3 हजार 500 किमी ची तीर्थयात्रेचा आनंददायी प्रवास पूर्ण करून आज गुरुवारी 3.15 ला सर्व महिला मंडळी मारेगावात पोहचल्या. यावेळी सर्व महिलांनी विशाल किन्हेकर यांचं औक्षण आणि शब्द सुमणांनी आभार मानण्यात आले. तर विशाल किन्हेकरांनी देखील भाऊंना साथ दिल्याबद्दल यावेळी सगळ्या लाडक्या बहीणींचे आभार मानले.
शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या स्वखर्चातून लाडक्या बहिणींना घडले 11 ठिकाणचे देवदर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2025
Rating: