टॉप बातम्या

अरुण बिलोरिया यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : रविनगर येथील यशस्वी उद्योजक राजाभाऊ बिलोरीया यांचे लहान बंधू अरूण बिलोरीया यांचे सोमवारी नागपूरात उपचारादरम्यान रात्री साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते 58 वर्षाचे होते.

मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी अचानक रात्री प्रकृती खालावली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच शहरात शोककळा पसरली आहे.

अरुण यांचे पाठीमागे पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, व मोठा असा बराच आप्त परिवार आहे.
आज 4 मार्च रोजी दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
Previous Post Next Post