शाहू फुले आंबेडकर विचारवंत सुषमा अंधारे आज वणीत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज जयंती निमित्त वणी येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी जिल्हा यवतमाळ, संत रविदास प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन संत रविदास प्रबोधन केंद्र, आंबेडकर चौक येथे करण्यात आले आहे. 

फुले, शाहू, आंबेडकर विचारवंत तथा शिवसेने (उबाठा) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे आज १४ फेब्रुवारीला जाहीर प्रबोधन हॊणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. प्रतिभा धानोरकर, सरोजताई बिसुरे (राष्ट्रीय अध्यक्ष), किरण देरकर, मिना भागवतकर (प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) असणार आहे. 

या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास सुधार मंडळ तसेच संबा वाघमारे (विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ) यांनी केले आहे.
शाहू फुले आंबेडकर विचारवंत सुषमा अंधारे आज वणीत शाहू फुले आंबेडकर विचारवंत सुषमा अंधारे आज वणीत Reviewed by सह्याद्री चौफेर on February 14, 2025 Rating: 5
Powered by Blogger.