विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बुरांडा येथील एका विवाहित महिलेने मध्यरात्री चक्क विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना आज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मंदा आनंद ताकसांडे (वय 40) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.ती आजाराने ग्रस्त असल्याचे समजते. तिने मध्यरात्री गावातीलच विहिरीत उडी घेऊन जिवन संपवल्याचे सकाळी नातेवाईकांनी शोध घेतला असता गावातीलच एका विहिरीत मृतदेह आढळून आला. 
विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on February 13, 2025 Rating: 5
Powered by Blogger.