वणी पोलीस स्टेशन येथील बेवारस दुचाकी वाहन व लोखंडी भंगाराचा लिलाव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत लवकरच पोलीस ठाण्यांमधील भंगार व दुचाकी वाहनांचा लिलाव दि.16 फेब्रुवारी ला होणार आहे, न्यायालयाने आदेश दिल्याने 3 मोटरसायकल व 400 किलो लोखंडी भंगारचा लिलाव घेण्यात येणार असं पोलीस प्रशासनाने कळवलं आहे.

विविध गुन्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आवारात एकूण 3 दूचाकी वाहन व 400 किलो लोखंडी भंगार बेवारस होती. या वाहनांची लिलाव न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. तीन दुचाकीसह एकुण 400 किलो बेवारस लोखंडी भंगार पोलीस स्टेशन वणीचे आवारात जमा आहे. सदरचा मुद्देमाल खुप दिवसापासुन पोलीस स्टेशनला जमा असल्याने व पो.स्टे.ला मुद्देमाल ठेवण्यास जागा अपुरी पडत असल्याने तसेच सदरचा मुद्देमाल जंग लागुन खराब होण्याची प्रक्रिया सुरु असल्याने मा.प्रथमश्रेणी न्यायालय वणी यांचे आदेशान्वये तसेच मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब वणी यांचे आदेशाने वरील नमुद मुद्देमालाचा रविवारी नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येत आहे,इच्छुकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं. 
वणी पोलीस स्टेशन येथील बेवारस दुचाकी वाहन व लोखंडी भंगाराचा लिलाव वणी पोलीस स्टेशन येथील बेवारस दुचाकी वाहन व लोखंडी भंगाराचा लिलाव Reviewed by सह्याद्री चौफेर on February 14, 2025 Rating: 5
Powered by Blogger.