टॉप बातम्या

विद्यार्थी होणार संगणक साक्षर...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : कानडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट दिल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाचे धडे गिरविण्यातील अडचण दूर झाली आहे. 

शाळेतील विद्यार्थ्यांची संगणक शिकण्याची इच्छा लक्षात घेवून येथील सरपंच सौ सुषमा रुपेश ढोके यांनी ग्रामपंचायतच्यावतीने शाळेला संगणक संच मिळवण्यासाठी पुढाकार घेतला. शाळेत उपलब्ध झालेला संगणक हाताळायला मिळताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री निते सर विद्यार्थ्यांचे पालक संतोष बावने, विनोद डाहूले, गावातील रामचंद्र येवले, अशोक चिडे, रूपेश ढोके, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन पानघाटे व विद्यार्थी उपस्थित होते.
Previous Post Next Post