सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगांव : सध्या परिस्थितीत ऐकीव इतिहासाच भांडवल करित महापुरुषांच्या शौर्याचा इतिहास पुसण्याचे काम करुन काही बाजारबूनगे तथाकथित इतिहासकार समाजात दुरी निर्माण करण्याच काम सुरु करीत आहेत.समस्त तरुणाईचे आयकॉन छत्रपती शिवाजी असताना त्यांची धोरणे , त्यांच्या निती त्यांचे कार्य अंगीकारून जीवन जगण्यासाठी उपयोगी होते.मात्र तरुनाई आज वाम मार्गाला जाऊन आपले कॅरीयर बरबाद करून धोके पत्करून घेत आहे.युवकांनी रिलस्टार होण्यापेक्षा शिक्षण उद्योगाचा मार्ग अवलंबून रिअरस्टार होण्याचा सल्ला मराठा सेवा संघ आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवात महाराष्ट्रातील परखड वक्त्या प्रतिक्षा गुरनुले यांनी मारेगांव येथे प्रतिपादन केले.
मराठा सेवा संघ आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य मारेगांव येथील नगरपंचायत प्रांगणात झालेल्या अभिवादन सभेत कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश गवळी होते तर प्रमुख अतिथी तहसिलदार उत्तम निलावाड, पोलीस निरिक्षक संजय साळूंखे, नगरपंचायत मारेगांवचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, विस्तार अधिकारी प्रदिप रामटेके विचारपिठावर उपस्थित होते, जिजाऊ वंदनेने अभिवादन सभेला सुरवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व प्रशासकीय अधिकारी, सामाजीक संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित महिला पुरुष, विद्यार्थ्यानी अभिवादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठा सेवा संघाचे सचिव विजय घोडमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ नितिश राऊत यांनी केले, १९ फेब्रुवारीला सकाळ पासून सुरु झालेल्या जयंती सोहळ्याला शिवप्रेमी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीते साठी इंजि अनंत मांडवकर, अनामीक बोढे, सुधाकर इंगोले, प्रमोद लडके, प्रकाश कोल्हे, कुंदन पारखी, विलास पोटे, सुंदरलाल आत्राम, सिद्धार्थ ढवळे, भारत मत्ते, सुभाष डोंगरकर, आत्राम सर, किशोर बोढे, स्वाती बोढे, शितल पारखी, विद्या मते, विद्या मांडवकर, रंजना आत्राम, सुचित्रा गवळी, लिना पोटे, सारिका कोल्हे परिश्रम घेतले .
रिलस्टार होण्यापेक्षा रिअलस्टार व्हा- प्रतिक्षा गुरनुले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2025
Rating: