वणी ते नांदेपेरा रोडची तत्काळ दुरुस्ती करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी (साई मंदिर) ते नांदेपेरा (नांदेपेरा) चौफुली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली असून यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले आहे. याचा मानसिक आणि शारीरिक त्रास प्रवाशांना होत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. 

वणी नांदेपेरा रोडने अनेक खेड्यांचा संपर्क आहे . याच मार्गावर अनेक प्राथमिक शाळा, महाविद्यालये, कंपनी, व्यायामशाळा, शेती व अनेक उद्योग आहेत. दिवसाकाठी शेकडो विद्यार्थ्यांची ये – जा असते. तर अनेक वृद्ध व युवा या रस्त्यावर शतपावली – फिरण्यासाठी जात असतात. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान सहान अपघात होत आहे. तर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना व परिसरातील रहिवाशांना श्वसनाचे आजार होत आहे. त्यामुळे ह्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता केतन परतानी यांना निवेदन देऊन येत्या ८ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करणार असल्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला. तर या निवेदनाच्या प्रती कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा व पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, वणी यांना देण्यात आली. यावेळी मयूर गेडाम, अंकुश बोढे, हिरा गोहोकार, प्रदिप बदखल, विजय चोखारे, प्रवीण कळसकर, सागर लखपती, संदीप बदखल, राहुल देवनपल्लीवार आदी उपस्थित होते.
वणी ते नांदेपेरा रोडची तत्काळ दुरुस्ती करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा वणी ते नांदेपेरा रोडची तत्काळ दुरुस्ती करा, मनसेचा आंदोलनाचा इशारा Reviewed by सह्याद्री चौफेर on February 25, 2025 Rating: 5
Powered by Blogger.