सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : भीम आर्मी संघटनेच्या वणी तालुका अध्यक्षपदी माजी अध्यक्ष हरीष पाते यांची निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य, शेतकरी, मजूर, विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विरोधात राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या वतीने वरीष्ठ पातळीवरुन न्याय मिळवून देणारी भीम आर्मी संघटनेची चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीची शाखा तालुका पातळीवरुन कार्यान्वीत करण्यासाठी वणी तालुका राष्ट्रीय आझाद समाज पार्टीच्या भीम आर्मी संघटनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असुन वणी तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हरीश पाते यांची निवड करण्यात आली आहे. भीम आर्मीचे वणी विधानसभा अध्यक्ष श्री. रवींद्र मेश्राम यांनी निवडीचे पत्र नवनिर्वाचीत अध्यक्ष हरीष पाते यांचेकडे सुपूर्द करुन पुढील शाखा विस्तारीत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
"भीम आर्मीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे. बहुजन समाजातील लोकांमध्ये विश्वास निर्माण करून संघटनेला अधिक बळकट करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल." असे हरीश पाते यांनी सांगितले.