अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शहरात वास्तव्य करणाऱ्या एका 31 वर्षीय युवकाने, अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवुन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून,प्रकरणी विविध कलमान्वये मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. प्रकाश उर्फ बाबा खंगार (31) मारेगाव वार्ड क्रमांक 7 असे गुन्हे दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
फिर्यादिने घटनेची तक्रार 21 फेब्रुवारी 2025 ला मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मारेगाव पोलीसांनी तपास चक्रे जलद गतीने फिरविली असुन आरोपीला आज 26 फेब्रुवारी 2025 ला अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनाखाली आनंद आचलेवार यांनी पोस्टे. अप क्र. 24/2025 कलम 137 (2) अन्वये गुन्हे नोंद केले होते. मात्र पिडीता अनुसुचित जमाती मध्ये येत असल्याने अनुसुचित जात, जमाती प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्ह्यात आणखी वाढ करण्यात आलीआहे. संशयीता विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अनुसुचीत जात जमात प्रतीबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असुन पिडीताचा सविस्तर जबाब नोंदवुन गुन्ह्याचे कागदपत्रात समाविष्ठ करण्यात आला आहे. 
सदर गुन्ह्यामध्ये अनुसुचित जात, जमात प्रतिबंधक कायद्या चे कलमांचा समावेश असल्याने सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किन्द्रे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on February 27, 2025 Rating: 5
Powered by Blogger.