टॉप बातम्या

अपघातात दोन तरुण गंभीर,वणी मारेगाव रोडवरील घटना

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : वणी-मारेगाव हायवे वर दुचाकींला अपघात होऊन दोन तरुण गंभीर जखमी झालेत, ही घटना मंगळवारी रात्री साडे दहा च्या सुमारास घडली असा कयास आहे. 

विजय संभाजी थेरे (अंदाजे वय ३५), व नितीन खुशाल पायघन (अंदाजे वय २७) रा. पहापळ, अशी जखमींची नावे आहेत. मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील रहिवाशी असलेले हे दोनही जण दुचाकीने आपल्या गावी परतत असतांना वणी मारेगाव महामार्गांवरील निंबाळा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला रात्री भीषण अपघात झाला. यात हे दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली की, दुचाकी अनियंत्रित होऊन ते रोडवर पडले याबाबत कुठलाही निष्कर्ष अद्याप लागला नाही. 

सदर दुचाकीला जनावर आडवे आल्याने हा अपघात झाला असावा असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. वणी येथे प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असल्याचे समजते.
Previous Post Next Post