वणी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन,हिंदुत्ववादी विविध संघटना आक्रमक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शेकडो गोवंशाचे शीर आढळून आले होते. त्यामुळे वणी शहरातील हिंदुत्ववादी विविध संघटना आक्रमक झाली असून सदर घटनेचा तीव्र निषेध केल्या जात आहेत. याबाबत निवेदन सादर करून आरोपीना तत्काळ अटक करा अशी मागणी होती, मात्र आरोपीना अटक करून त्यांना न्यायलयानेही जामिनावर सोडले. 

 त्यामुळे संतापलेल्या हिंदू समाज बांधवानी आक्रमक होत आरोपींच्या या गुन्ह्यामुळे शहरातील जातीय सलोखा बिघडण्याचा धोका निर्माण झालेला असतांना त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य कलम लावल्या. आरोपींवर सौम्य कलम लावण्यात आल्याने न्यायालयानेही त्यांना जामिनावर सोडले. तेव्हा या सर्व आरोपींवर व त्यांच्या मुख्य सूत्रधारांवर वाढीव कलम लावून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी सर्व गौरक्षक हिंदू समाज बांधवांनी एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्याकडे लेखी अर्जातून केली आहे. तसेच या मागणीला घेऊन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनही केले. 

आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवि बेलुरकर, तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेंडे, अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, कृणाल चोरडिया, राहुल पारखी, श्रीकांत पोटदुखे यांच्यासह शेकडो हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
वणी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन,हिंदुत्ववादी विविध संघटना आक्रमक वणी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन,हिंदुत्ववादी विविध संघटना आक्रमक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 14, 2025 Rating: 5
Powered by Blogger.