टॉप बातम्या

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून रवि वल्लमवार यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघाकडून सन्मान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा : दि. ६ जानेवारी २०२५ सोमवार रोजी वर्धा जिल्ह्याच्यावतीने युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह नागपुर रेल्वे संपन्न झाले होते, या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचे व परराज्यातील अनेक जिल्ह्यातील पत्रकावर बंधू आणि भगिनी आवर्जुन उपस्थित होते.

या अधिवेशनामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेचे लक्ष्मण टेकाळे,भाजपा शहराध्यक्ष प्रभात लोढा,विभागीय अध्यक्ष विनोद कनाके युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष रोहिणी बाबर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार मान्यवरांच्या हस्ते पत्रकार क्षेत्राचे जनक आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित अनेक पत्रकारांचा मानसन्मान व सत्कार करण्यात आला.

यामध्ये केळापूर तालुक्यातील चालबर्डी या गावात राहणारे व दैनिक जन-संग्राम वृत्तपत्राचे पत्रकार रविंद्र दिपक वल्लमवार यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार व उपस्थित मान्यवरांने शाल श्रीफळ देऊन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावर गौरविण्यात आले युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नागपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनामध्ये उत्कृष्ट पत्रकार ग्रामीण भागात राहणारे रवि वल्लमवार यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफल सन्मान चिन्ह गौरवण्यात करण्यात आल्याने दैनिक जन-संग्राम समूह व केळापूर तालुक्या सह पांढरकवडा शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post