गणेशपूर (वणी) येथे डायरेक्ट रट्टा व्हालिबॉल सामने संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : गणपती व्हालिबॉल योद्धा मंडळ, गणेशपूर द्वारा आयोजित दि. 10,11,व 12 जानेवारी 2025 असे तीन दिवसीय डायरेक्ट रट्टा व्हालिबॉल सामने आयोजित करण्यात आले होते. या टूर्नामेंट मध्ये एकूण 28 टीमांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम बक्षीस, 11016 रु. जगदंबा क्रीडा मंडळ, गणेशपूर यांनी पटकाविले, दुसरे बक्षीस 7016 रु. फ्रेंड्स क्रीडा मंडळ, छोरिया यांनी पटकाविले तर तृतीय बक्षीस 5016 रु. धनोजे कुणबी क्रीडा मंडळ, वणी यांनी पटकाविले. 

या संपूर्ण व्हालिबॉल सामन्यामध्ये उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून वेदांत ठावरी, उत्कृष्ट शॉटर म्हणून प्रदीप वासेकर तर उत्कृष्ट नेटर म्हणून सतीश आसूटकर यांची निवड करण्यात आली. सर्व सामान्यामध्ये अंपायर म्हणून जगदीश ठावरी, किशोर सोनटक्के, शांताराम झाडे व संदीप बोबडे यांनी भूमिका बजाविली. मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व गणेशपूर गावातील तरुण उत्साही क्रीडा प्रेमी,प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी वेळ देऊन तीन दिवस सहकार्य करून कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडला.
गणेशपूर (वणी) येथे डायरेक्ट रट्टा व्हालिबॉल सामने संपन्न गणेशपूर (वणी) येथे डायरेक्ट रट्टा व्हालिबॉल सामने संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 14, 2025 Rating: 5
Powered by Blogger.