सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेना - पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकरिता संपर्कप्रमुखपदी आमदार संजय देरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.
गेल्या वर्षभऱ्यात आ.देरकर यांनी पक्षाला वणी विधानसभेत वैभव प्राप्त करून दिले. वणी विधानसभा प्रमुख पदी असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून कार्यकर्त्यांमध्ये नवंसंजीवनी निर्माण केली. त्याच जोरावर आज ते आमदार झाले आणि आज त्यांची चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने कार्यकर्त्यामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा सह अभिनंदनचा वर्षाव होत आहेत.
जिल्हा प्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्यात आला आहे. कार्यक्षेत्रात बदल केलेल्या बदलामध्ये संदीप गिन्हे - जिल्हाप्रमुख (विधानसभा - चंद्रपूर, बल्लारपूर), मुकेश जीवतोडे - जिल्हाप्रमुख - (विधानसभा राजूरा, वरोरा-भद्रावती) आणि रवींद्र शिंदे जिल्हाप्रमुख - (विधानसभा - चिमूर, ब्रह्मपुरी) या पदांचा समावेश आहे.
चंद्रपूर लोकसभा संपर्कप्रमुख पदी आ.संजय देरकर यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 22, 2024
Rating: