सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार भीमनगर वणी, येथे उपवर - वधु परिचय व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सद्या धकाधकीच्या जीवनामध्ये भेटीगाठी कमी झालेल्या आहेत, त्यामुळे एकमेकांसोबत बरेच दिवस भेट होत नसल्याने एकत्र आणण्याकरीता तसेच समाजातील पालक आणि उपवर- वधुसाठी हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजबांधव एकत्रित यावे आणि उपवर- वधु यांचा परिचय होऊन लग्नगाठ बांधण्याचा उद्दात हेतू आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मपाल माने सर यवतमाळ तर या कार्यक्रमाचे उदघाटक विवेक मेश्राम सर वर्धा, प्रमुख उपस्थिती पंढरीनाथ आडे सर राहणार आहेत, या मेळाव्यामध्ये युवक युवतीचा परिचय होणार असून त्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उपवर-वधू यांची नोंदणी मेळाव्याच्या ठिकाणी मेळाव्याच्या दिवशी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान करण्यात येईल. उपवर-वधु यांनी मेळाव्यात येताना एक फोटो सोबत आणावा. या मेळाव्यात उपवर-वधु घटस्फोटित वधु-वर विधवा -विधुर वधु-वर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक इंदुताई वाघमारे ८६६८४६०४०५ सुहास नगराळे. विलासजी वाघमारे साहेब. यांनी केले आहे.
वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळावा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 22, 2024
Rating: