आपण आपल्या समाजाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून वाचवू शकत नाही - जसिंता केरकट्टा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : आदिवासी समाजाचे अस्तित्व व निसर्ग वाचवण्यासाठी स्वराज्यासाठी सक्षम होण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. केवळ नाव आणि प्रतिष्ठा मिळवून आपण आपल्या समाजाला वाचवू शकत नाही.असे प्रतिपादन विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा ह्यांनी केले. 

आपल्याला समाजात जावं लागेल व त्यांना भेटावं लागेल. त्यासाठी वाचन, लेखन, घडवण्याची, संघटित होण्याची, आपल्यातील कमतरता आणि बलस्थाने ओळखण्याची गरज आहे. वडगाव रोड सहकार सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कवियत्री केरकट्टा बोलत होत्या.

साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक वसंत कनाके, प्रब्रह्मानंद मडावी, डॉ. संजय जी लोहकरे, डॉ.अरविंद कुळमेथे, बाळकृष्ण गेडाम, शीतलताई ढगे, राजू मडावी, शंकर मडावी, कुसुम अलाम, विद्याताई परचाके, कनाके, पैकू आत्राम, ऍड. अरविंद सिडाम आदी उपस्थित होते.

या प्रसंगी विचारवंत, पत्रकार तथा कवियत्री जसिंता केरकट्टा (झारखंड) यांचा सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना जसिंता केरकेट्टा म्हणाल्या की, विकास आणि धर्माच्या नावाखाली आदिवासींचा बळी देणारी मोठी व्यवस्था ओळखण्याचीही गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. चांगल्या जगाची स्वप्ने पाहणाऱ्या सर्व लोकांना जुडण्याचे आणि जोडण्याचे मार्ग देखील आपण शोधले पाहिजेत. यावेळी त्यांनी या साहित्य परिषदेला शुभेच्छा देत आयोजकांचे मानले. त्यानंतर इतरही मान्यवरांचा सत्कार व आपापले विचार मांडले. या 'तिसरी नवोदित आदिवासी साहित्य परिषदेला राज्यभऱ्यातून मान्यवर व साहित्य प्रेमी उपस्थित होते.
आपण आपल्या समाजाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून वाचवू शकत नाही - जसिंता केरकट्टा आपण आपल्या समाजाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून वाचवू शकत नाही - जसिंता केरकट्टा Reviewed by सह्याद्री चौफेर on December 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.