सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पर्यावरण संरक्षण काळाची गरज आहे. एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य, प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळेल.
वृक्षारोपण वृक्षसंवर्धन "एक वृक्ष आरोग्य स्वस्थ" चला आज पासून संकल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया. ही संकल्पना घेऊन मनसे नेते राजू उंबरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. तृप्ती उंबरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मनसे परिवाराला सोबत घेऊन शहरातील देशमुख वाडी, विठ्ठलवाडी या भागात वृक्षारोपण करण्यात आले. मनसे परिवारातील प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला असे अभिनव उप्रकम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून सौ. उंबरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले..
या प्रसंगी मनसे परिवारातील असंख्य महिला व सदस्य उपस्थित होते..
सौ. तृप्ती उंबरकर यांच्या वाढदिसानिमित्त वृक्षारोपण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 24, 2024
Rating: