सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथे सी.सी.आय कडून कापूस खरेदी सुरू आहे. दिनांक 23 डिसेंबरला शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर कापूस विकण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत गाड्या आणल्या होत्या. दिवसभर खरेदी होवूनही सायंकाळ पर्यंत 150 ते 200 गाड्या बाजार समितीच्या आवारात उभ्या होत्या. वेळ झाल्यामुळे सी.सी. आय. ने खरेदी बंद केली. ही बाब माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना समजताच त्यांनी बाजार समिती गाठून वरिष्ठांशी बोलणी करून तत्काळ कापसाच्या गाड्या खरेदी करायला लावल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज सी.सी. आय. ठरलेल्या वेळेपर्यंतच कापूस खरेदी करते. परंतु खेड्या - पाड्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना येथे बाजार समितीत कापसाच्या गाड्यासह मुक्काम करणे अतिशय त्रासदायक आहे. काल शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या बाजार समिती परिसरात उभ्या असल्याची माहिती मिळताच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सायंकाळी 6 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती गाठली. तिथे शेतकरी बांधवांच्या अवस्था पाहून त्यांनी लगेच अकोला झोनचे मुख्य व्यवस्थापक निरज कुमार यांच्याशी संपर्क साधून सी.सी.आय. ने कापूस खरेदी सुरू करून बाजार समितीच्या आवारात उभ्या असलेल्या शेतकरी बांधवांच्या गाड्या सोडण्यात याव्या याविषयी विनंती करून वणी केंद्र प्रमुख हेमंत ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्वरित 10 मिनिटात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायला भाग पाडले. यावेळी उपसभापती विजय गारघाटे,सतीश दोरखंडे उपस्थीत होते.
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे या परिसरात असलेल्या शेतकऱ्याची होणाऱ्या हाल अपेष्टा पासून सुटका मिळाली. सर्व शेतकऱ्यांनी माजी आमदार बोदकुरवार यांचे मनापासून आभार मानले.
माजी आमदार बोदकुरवार यांच्या मुळे शेतकऱ्याचा कापूस खरेदी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 24, 2024
Rating: