सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : खैरी स्टॉप ते वरोरा कडे जाणाऱ्या सिमेंट रोडचे अर्धवट काम तत्काळ सुरु करा, यामागणीला घेऊन खैरी ग्रामस्थांनी आज मंगळवारला सकाळी 11 वाजता नमूद रस्त्यावरच आंदोलन सुरु केले. यावेळी किमान एक तास वाहतुक कोलमडली होती.
गेल्या दिड वर्षांपासुन खैरी गावाच्या मुख्य मार्गाचे काम अतिशय संथगतीने आहे. त्यामुळे खैरी गावातील शाळेतील विद्यार्थी, शेतकरी, तसेच वाहनचालकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत होता,रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अनेक अपघात होऊन किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना पण येजा करावी लागत असल्याने अनेकदा मोठ्या वाहनांचे चाक रस्त्याच्या खाली उतरुन रस्त्यावरील रखडलेली गिट्टी विद्यार्थ्यांच्या डोक्याला लागत असल्याची ओरड होत असल्याने सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाकडून काम विलंब होत असल्यामुळे संथगतीने होणारे रोडचे काम हे जलद गतीने करून लवकरात लवकर रोडचे काम पूर्ण करण्यात यावे,या मागणीसाठी खैरी गावातील ग्रामस्थांनी आज चक्क रोडवर बसुन "चक्काजाम आंदोलन" करण्यात आले.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी आंदोलनास भेट देऊन रोडचे काम हे सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जोरदार मागणी केली होती.
खैरी रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा; ग्रामवासीयांनी आंदोलन छेडून केली मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 24, 2024
Rating: