मच्छिन्द्रा गटग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मच्छिन्द्रा गट-ग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याचा उद्देश पेसा ग्रामपंचायतींतर्गत पेसा गावांमध्ये पेसा कायद्याविषयी जनजागृती करावी, नागरिकांपर्यंत पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे, नागरिकांनी देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पेसा दिवस साजरा करावा या बाबत जनजागृती करण्यात आली.
त्यामध्ये ग्रामपंचायत चे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पेसा अध्यक्ष, व इतर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट, मोबाईलायजर आदी कर्मचारी व गावातील नागरिक आणि महीला वर्ग उपस्थीत होते.

सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, त्यानंतर क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. शाळेतील मुलांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन, मार्गदर्शन व आभार प्रदर्शन सचिव श्री.एम ए तिरपूडे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायतची सभा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मच्छिन्द्रा गटग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' साजरा मच्छिन्द्रा गटग्रामपंचायत अंतर्गत 24 डिसेंबर 'पेसा दिन' साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on December 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.