सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा चौक वणी येथे स्मृती दिनाच्या निमित्ताने किरण ताई संजय देरकर यांच्या प्रमूख उपस्तीतित मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व हारार्पण कार्यक्रम सकाळी 10 वाजता संपन्न झाला.
सर्वप्रथम श्री संत गाडगे बाबांच्या स्मारकाला किरनताई संजय देरकर, विजय चोरडिया, दिपक कोकास,सुनील कातकडे, संभाजी वाघमारे, दिलीप मस्के, शेखर चिंचोलकर, यांचे हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गरजूंना ब्ल्यंकेट तर महाप्रसादाचे वितरण.
संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिननिमित्त गरजवंताला ब्ल्यांकेट वाटप नगर सेवा समितीच्या वतीने विजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनात तर महाप्रसादाचे वितरण व्यवस्था संभाजी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली.
गाडगे बाबांच्या कार्याची उजळणी.
गुरुदेव सेवा मंडळाचे ठेंगणे, विजयाताई दहेकर, विजय चोरडिया, किरणताई देरकर,सुनील कातकडे व दिलीप मस्के यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याची महती सांगितली.
समाजाला गाडगे बाबांच्या स्वचछता व शिक्षणाची व निर्व्यसनी जिवन जगण्याच्या विचारांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन किरणताई देरकर यांनी केले.
यावेळी गीता ताई उपरे, नंदा गुहे, चंदा मुन, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, पुष्पाताई भोगेकर, सुरेखा आवरी, कलावती क्षिरसागर, भावना मुके,बेबी ताई थेटे, प्रतिभा फाले, गीता तुरणकर, संगीता दोडके,रिंकू महाकुलकर, रुपाली महाकुलकर, साधना तुरणकर , माधुरी फाले राजु तुरणकर, प्रवीण खानझोडे, रवी बोडेकर, गुलाब आवारी, संजय देठे भगवान मोहिते, दिलीप भोयर, विनोद ढुमणे, राजु धावंजेवार, प्रदीप मुके, मंगेश भोस्कर, उमाकांत भोजेकर, नितीन बिहारी, स्वप्नील बिहारी, महादेव दोडके, संदिप फाले, गजनान पिंपलकर, अरविंद क्षीरसागर, राजेश महाकुलकर, दिलीप नांदे, भास्कर पत्रकार, डॉ जगन जुनगरी, नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, गणेश दूरकर, सुमित तुरानकर, संजय तुराणकर, संदीप फाले, पुरुषोत्तम थाटे, सुनील चिंचोळकर, पवन महाकुलकर, सतीश दोडके, दिवाकर नागपूरे, सचिन क्षिरसागर, विनोद महाकुलकर, मंगल भोंगळे,राजु बोबडे, विजय गुडदे, गजेंद्र थेटे, संजय चिंचोलकर, गणेश दोडके उपस्तीत होते.
स्मारक स्थळी वृक्षारोपण..
आज श्री संत गाडगेबाबा स्मारक निळापूर रोड येथे संत गाडगेबाबांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून बाबांच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस वणीत अभिवादन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 20, 2024
Rating: