दहाव्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेची छेड काढणारा युवक गजाआड

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : नवरगाव येथे तालुका स्तरीय क्रीडा सामने बघायला गेलेल्या सगणापूर येथील तरुणाने बालिकेची हात पकडत छेड काढत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक करण्यात आली.आशिष उर्फ गोलू रमेश धानोरकर (19) असे संशायित आरोपीचे नाव आहे.

संशायित याने तीन वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेची छेडखाणी केली होती. सदर पिडीत बालिकेसोबतही सातत्याने लगट लावत होता.मात्र, ताकीद देवून सामंजस्याने हे प्रकरणे निवळली होती. मात्र,सदर पिडीत मुलीवर गत दोन महिन्यापासून पाळत ठेवून अधूनमधून बहाण्याने तो तिला धमकीवजा टावरे मारत असे.

गुरुवारला शालेय क्रीडा सामने नवरगाव येथे असतांना पिडीत बालिका सामने बघत होती. सामना सुरु होण्यापूर्वी ती मैत्रिणी सोबत पाणी पिण्यास प्रांगणाच्या बाहेर आली तोच चक्क तिची छेड काढू लागला. माझ्याशी का बोलत नाही. एवढेच नव्हेतर कुणाला सांगितल्यास तुला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीने ती पूर्णतः घाबरली. क्रीडा सामने बघणे सोडून ती स्वगावी परतली. घरी ढसाढसा रडत असतांना भाऊ कॉलेजमधून घरी आला. आई वडील नातेवाईकांकडे गेले होते. भावाला आपबिती कथन केल्यागत थेट पोलीस स्टेशन गाठले. तक्रार दाखल होताच संशायित आरोपी आशिष रमेश धानोरकर (वय 19) याचेवर पोस्को कलम 74,75,78,8,12 अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा 3 (1), 3 (2) नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दहाव्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेची छेड काढणारा युवक गजाआड दहाव्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेची छेड काढणारा युवक गजाआड Reviewed by सह्याद्री चौफेर on December 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.