सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वणी विधानसभा मतदारसंघातील वणी मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनाचे सर्व पदे बरखास्त करण्यात आले.
या पदावर लवकरच नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देऊन पक्ष संघटन मजबूत करण्यात येणार असल्याची माहिती पक्षनेते राजू उंबरकर यांनी जाहीर केलेल्या पत्रातून घोषित केले.
मोठी बातमी: मनसेच्या सर्व कार्यकारण्या बरखास्त, राज ठाकरे यांचे आदेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 08, 2024
Rating: