टॉप बातम्या

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतिने तिव्र निदर्शने व आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : अदाणी समुहाच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारप्रकरणी गौतम अदाणीवर कारवाई करा, मणीपुरमधील हिंसाचारप्रकरणी, मुख्यमंत्री विरेन सिंह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, वाढती महागाई व बेरोजगारीला आळा घाला, ईव्हीएम हटाव-लोकशाही बचाव या आणि अन्य मागण्यांना घेऊन आज 10 डिसेंबर "प्रोटेस्ट डे" म्हणुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्याअनुषंगाने आज भाकपने मारेगाव तहसीलसमोर तिव्र निदर्शने करून मा.राष्ट्रपती यांचे नावे तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले.
आंदोलनात जिल्हा सहसचिव बंडु गोलर,तालुका सचिव विलास ढुमणे,धनराज अडबाले लता रामटेके,सुभाष पंधरे,विनोद ढोके,सुनिल आत्राम,कैलास आत्राम,रंजना टेकाम,संदीप टेकाम,शब्बिर खॉ पठाण,ईरफानभाई,दत्तु कोहळे यांचेसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
Previous Post Next Post