सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील जनतेचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामाच्या कापूस, सोयाबीन या नगदी पिकांवर अवलंबून असणा या शेतकरी व शेतमजूरांना शेती रिकामी झाल्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागते. सरसकट सोयाबीनची काढणी झाली असून कापसाची वेचणीही अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने मजुरवगार्ने आपला मोर्चा मोठ्या शहरांकडे वळविला आहे. दिग्रस तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी व शेतमजूर पुणे, मुंबई या महानगरात तर काही उपराजधानीत कामासाठी स्थलांतरित होतात. आपल्या मुलांचे शिक्षण अर्धवट सोडून काही खेडेगावातील लोक आता पोटपाण्यासाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. या बाबीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्यातील जनतेला कामाच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याने या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा भगीरथ लोकप्रतिनिधी उदयास येईल का, असा सवाल निर्माण होत आहे. तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर दरवर्षी स्थलांतरित होतात. अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागते. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर कुपरिचित आहे. त्यातच मारेगाव तालुक्याची ओळख आणखीनच आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून होत चालली आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासन यंत्रणा लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर बेरोजगारांसाठी एम आय डी सी आणि येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध असती तर या कुटुंबावर आपल्या तरुणांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली नसती. मात्र, वास्तव फार भयान असल्यामुळे या परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
कामाच्या शोधात बेरोजगार,शेतकरी शेतमजूरांची भटकंती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 10, 2024
Rating: