हिवाळी अधिवेशनात आंदोलनात्मक भूमिका घेऊन कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणार - सौ. इंदिरा बोन्दरे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

पांढरकवडा 
: कोलाम समाजाच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी प्रशासनाने निष्कासित न करता शेतीसाठी विकसित करण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारने धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा या मागणीसाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्वात वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय दरेकर यांच्याकडे तर पाठपुरावा करणार च आहे. परंतू सत्ताधारी फडणवीस सरकारचे आमदार राजु तोडसम, आमदार अशोक उईके यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार असल्याचं शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी पांढरकवडा येथे संपन्न झालेल्या बैठकीत सांगीतले. 

सदर बैठक प्रामुख्याने मुंजाला येथील कोलाम समाजाच्या कब्जात असलेल्या जमिनी वन विभागांकडून निषकासित करण्याच्या हालचाली वन विभागांकडून सुरू झाल्या असल्यामुळे मुंजळा येथील बिगर सातबारा शेतकऱ्यांनी सौ.इंदिरा बोंदरे यांची भेट घेऊन सांगीतले. त्यानुसार सौ बोंदरे यांनी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुखदेव कांबळे यांना निमंत्रित करुन तात्काळ बैठकीचे आयोजन करुन कोलाम समाजातील बिगर सातबारा शेतकरी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल परंतू अन्यायाच्या विरोधात संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणार असल्याचं आश्वासन प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी दिले. 

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जरी आपल्याकडे दुर्लक्ष केले तरी वणी विधान सभा मतदार संघाचे आमदार संजय दरेकर हे आपल्या हक्काचा आमदार असल्यामुळे त्यांच्या मध्येमातून व भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात सरकारकडे निरंतर पाठपुरावा करणार असून नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनात्मक भूमिका घेऊन कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी सांगीतले.


        
हिवाळी अधिवेशनात आंदोलनात्मक भूमिका घेऊन कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणार - सौ. इंदिरा बोन्दरे हिवाळी अधिवेशनात आंदोलनात्मक भूमिका घेऊन कोलाम समाजाच्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करणार - सौ. इंदिरा बोन्दरे Reviewed by सह्याद्री चौफेर on December 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.