पांडव देवी दर्शनाला जाताना घडलेल्या अपघातातील दोन ठार, तर एकाला उपचार करून सुट्टी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : पांडव देवी येथे गोवर्धन यात्रा पाहण्यासाठी जात असलेल्या तिघांचा मारेगाव जवळील खडकी फाट्यावर अपघात झाला होता.  
या अपघातात तिघे जखमी झाले असून यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते.                   
तालुक्यातील पांडव देवी येथे गोवर्धन पूजेच्या दिवशी मोठी यात्रा भरते. ही यात्रा पाहण्यासाठी परिसरातील तसेच बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक येथे येतात. येथे गाईची पूजा करून त्यांची मोठ्या प्रमाणात यात्रा काढली जाते. ही यात्रा बघण्यासाठी चोपण येथील रवींद्र हरिदास जोगी (39), शालिक चेंडकू जुनगरी (35) आणि संदीप कुडमेथे हे तिघेही शनिवार दि. 2 नोव्हेंबरला सकाळी (MH 29 AX 3682) या दुचाकीने पांडव देवी येथे जात होते. पांडव देवी जात असताना खडकी फाट्याजवळ अचानक दुचाकी अनियंत्रित होऊन यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नालीमध्ये जाऊन आदळली. 
हा अपघात एवढा जबरदस्त होता की, यातील दोघे गंभीर होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी यांना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. ग्रामीण रुग्णालय येथे यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होतं. 
यातील संदीप बादलशाही कुडमेथे याचे उपचारादरम्यान दि.2 नोव्हेंबरलाच मृत्यू झाला तर रवींद्र हरिदास जोगी रा. चोपण याचाही खासगी दवाखान्यामध्ये उपचारादरम्यान रात्री 12.30 च्या दरम्यान मृत्यू झाला. संदीपच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली तर रवींद्रच्या पाठीमागे आईवडील, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. संदिप वर ओसरला येथे तर रवींद्र जोगी यांचेवर चोपण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


पांडव देवी दर्शनाला जाताना घडलेल्या अपघातातील दोन ठार, तर एकाला उपचार करून सुट्टी पांडव देवी दर्शनाला जाताना घडलेल्या अपघातातील दोन ठार, तर एकाला उपचार करून सुट्टी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.