पांडव देवी मध्ये जाऊन संजीवरेड्डी बोदकुरवारांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज (ता.1) रोजी दिवाळी निमित्त मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर पांडव देवी येथे जाऊन आशीर्वाद घेतला
व भाविक, शेतकरी, मंजूर, नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत अविनाश लांबट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, माजी ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अभिजित मांडेकर उपस्थित होते.
दि. 2 ऑक्टोबर ला आज सकाळी भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिवाळी, गोवर्धन पूजा निमित्ताने पांडव देवी येथील उपस्थित शेतकरी, पुजारी, मजूर, युवक, नागरिकांना यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक भाविक व शेतकऱ्यांनी या निवडणुकीत महायुतीच्या मागे उभे राहणार असल्याचे नारा दिला. त्याचबरोबर मंदिराचे विश्वस्त मंडळ, पुजारी व समर्थकांनी उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे जोरदार स्वागत केले.
यावेळी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, अभिजित मांडेकर, गणेश खडसे, दादाराव ठोबरे, रवी टोंगे, प्रवीण बोथले, गणपत वऱ्हाटे, सुभाष खडसे, प्रवीण नान्हे, चंदू जवादे, प्रशांत नांदे, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



पांडव देवी मध्ये जाऊन संजीवरेड्डी बोदकुरवारांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा..! पांडव देवी मध्ये जाऊन संजीवरेड्डी बोदकुरवारांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा..! Reviewed by सह्याद्री चौफेर on November 03, 2024 Rating: 5
Powered by Blogger.