सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचाराची सुरुवात करण्यापर्यंत मनसेने आघाडी कायम ठेवली. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर यांच्या प्रचारार्थ आता राज ठाकरे यांची विदर्भात पहिली सभा येत्या ५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. वणीतील शासकिय मैदानात पाण्याच्या टाकीजवळ या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये राज ठाकरे यवतमाळ जिल्ह्यांतील उमरखेड, राळेगाव,पुसद यांच्या सह विदर्भातील मनसे उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रचार तोफा राज्यात धडाडणार आहेत यामध्ये सद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी घेत विदर्भात पहिली प्रचार सभा वणी विधानसभा मतदार संघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवार ला सायंकाळी ५ वाजता शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे आयोजन करण्यात आले आहे.
५ नोव्हेंबरला राज ठाकरे वणीत, उंबरकर यांच्या प्रचाराचा फोडणार नारळ..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 03, 2024
Rating: