पहापळ येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासून जीवनाला कंटाळून इहलोकी यात्रा या सारख्या घटनेत दिवसेंदिवस वाढतच आहे. यातच मारेगाव तालुक्यात सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळलेल्या एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहापळ येथे घडली. 
अर्जुन भाऊराव काळे (वय अंदाजे 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना 2 नोव्हेंबरला 4.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
         
मृतक अर्जुन काळे यांना तीन एकर शेती होती. तीन एकर शेतीच्या भरवश्यावर ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकलत होते. त्यांना दोन मुली असून, एक मुलगी विवाहित आहे तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षापासून उत्पन्न होत असलेली घट आणि डोक्यावर वाढत असलेला कर्जाचा बोझा यामुळे ते सतत चिंतेत असायचे असे समजते.
अशातच आज दिनांक 2 नोव्हेंबरला अर्जुन शेतामध्ये गेले. तिथून ते त्यांचे चुलत भाऊ अंकुश काळे यांच्या शेतात जाऊन कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना साडेचार वाजताच्या दरम्यान, उघडकीस आली. 
घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलिसांना दिली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते. पुढील कारवाई सुरू आहे. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
पहापळ येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या पहापळ येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on November 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.