श्रद्धालू च्या हाकेला धावणारी जनामाय कासामाय

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात नवरात्री उत्सव मोठ्या धुमधामात साजरा होत असताना या उत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे. ठिकठिकाणी  देवीच्या दर्शनासाठी भक्ताची गर्दी पाहायला मिळत असून नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवाला दुरुदुरून श्रद्धालू मोठ्या भक्तीभावाने दर्शनासाठी गर्दी करित आहे. 

नवरात्री उत्सवचा आज शेवट चा दिवस असल्यामुळे जनामाय कासामाय मंदिरात (वनोजा देवी) येथील देवीच्या दर्शनाला श्रद्धालू जातांना दिसतात. प्रत्येक भक्तांची मनोकामना पुर्ण होत असते अशी श्रद्धालू सांगतात. त्यामुळे नवरात्रीला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय देवी नवसाला पावणारी, भाविकांच्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारी म्हणून विदर्भासह वणी उपविभागात प्रसिद्ध आहे.
 

श्रद्धालू च्या हाकेला धावणारी जनामाय कासामाय श्रद्धालू च्या हाकेला धावणारी जनामाय कासामाय Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.