आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी आक्रमक; वणीत आज धरणे आंदोलन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अनुसूचित जमातीच्या आरक्षणात धनगर समाजाची घुसरखोरी रोखण्यासाठी आदिवासीच्या सर्व संघटना 'धरणे आंदोलन करणार आहेत, असे सौ. पुष्पा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांनी (ता. 3) रोजी बैठकीत सांगितले. जल, जंगल व जमीन संदर्भातले आदिवासींचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. आता तर आदिवासींमधील 3 टक्के आरक्षणाची धनगर समाज मागणी करत आहे. त्याला विरोध करण्यासाठी दिनांक 11 ऑक्टोबर ला आदिवासी बहुल भागातील आदिवासी संघटनांनी या एकदिवशीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत. त्यासाठी वणी तहसील कार्यालयासमोर आज शुक्रवारी 11 वाजता 'धरणे आंदोलन करण्यात येत आहेत, असे ॲड.अरविंद सिडाम, यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले.
आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी आक्रमक; वणीत आज धरणे आंदोलन आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी आक्रमक; वणीत आज धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.