कृषी पंपाना 24 तास मोफत वीज पुठवठा द्या - शेतकऱ्यांची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शेतकरी त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंप आणि बोअरवेलवर अवलंबून असतात, परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी व्होल्टेज आणि लाइन समस्या पंप योग्यरित्या काम करण्यास प्रतिबंधित करत आहेत. त्यामुळे खरीप पिक धोक्यात येण्याची काळजी वणी उपविभागातील शेतकऱ्यांना सतावत असल्याने 24 तास अखंडीत मोफत वीज पुरवठा द्यावा, अशा आशयचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले आहे. 

बहुतेक शेतकऱ्यांनी कपाशी यासह दैनंदिन गरजा भागवणाऱ्या पिकांचीही लागवड केली आहे, ज्याची वाढ होण्यास जास्त वेळ लागतो. त्यासाठी पाणी आवश्यक असते. पीक आता नाजूक अवस्थेत असून पुढील दिवस पाण्याची गरज आहे. बोअरवेल नसल्यामुळे काही शेतकरी नद्या, कालवे आणि नाल्यांचे पाणी वापरतात, परंतु वीज खंडित झाल्याने हे कठीण होत आहे. परिणामी झरी मारेगाव वणी या तीनही तालुक्यात दिवसा वीज पुरवठा बंद असतो, किंबहुना वीज पुरवठा हा सतत अनिमितता होत असते, रात्री बेरात्री वीज पुरवठा केला जातो, करिता शेतकऱ्यांना रात्रभर जागे राहावे लागते. परिणामी शेती व्यवसाय जिवंत ठेवायचा असेल व शेतकऱ्यांना जगवायचं असेल तर वीज कंपनीने निश्चित धोरण आखून शेतकऱ्यांना 24 तास वीज मोफत पुरवठा करणे गरजेचे आहे. असे शेतकऱ्यांचं म्हणणं असून शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्यामुळे व देशाचा विकास साधायचा असेल तर शेतकऱ्यांना भरघोस वीज पुरवठा तेही मोफत देणे आवश्यक आहे. येत्या सात दिवसात निवेदनाची दखल घेऊन अंमलबजावणी न झाल्यास झरी मारेगाव वणी तालुक्यातील सर्व शेतकरी आपल्या कार्याल्यासमोर आमरण उपोषणाला बसतील,असा ईशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

निवेदन देताना प्रवीण रोगे,विप्लव तेलतुंबडे, चंद्रशेखर देरकर,चंद्रभान पोतराजे, लहू वरारकर,किशोर काकडे, जयंत वरारकर, यासह शेतकरी आदींची उपस्थिती होती.
कृषी पंपाना 24 तास मोफत वीज पुठवठा द्या - शेतकऱ्यांची मागणी कृषी पंपाना 24 तास मोफत वीज पुठवठा द्या - शेतकऱ्यांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2024 Rating: 5
Powered by Blogger.