सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.त्यात शेवटच्या दिवशी 27 ऑगस्ट ला वणी शहरात भव्य शोभ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत टाळ-मृदुंगाच्या गजरात वारकरी भजन, नयन रम्य देखावे, आकर्षक रोशनाई, आदिवासी संस्कृती जपणारे गोंडी ढेमसा नृत्य, शिव तांडव नृत्य, मनमोहक गरबा, छत्रपती ढोल ताशा पथक, कोलकत्ता येथील महाकाली, भव्य बजरंग बली, यासह अनेक भव्य मनमोहक देखावे या शोभा यात्रेत सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.
शहरातून सायंकाळी सहा वाजता अमृत भवन मंदिर येथून शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान बगीमध्ये श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शिवपार्वती, विष्णू लक्ष्मी यासह विविध वेशभूषा परिधान करून या शोभा यात्रेत बालगोपाल सहभागी झाले होते. ही यात्रा अमृत भवन ते इंदिरा गांधी चौक, खाती चौक, गांधी चौक, कमान चौक, टागोर चौक, महाराष्ट्र बँक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशी मार्गक्रमण करत शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय की,या शोभा यात्रेत यावर्षी मनमोहक विविध देखाव्यांनी वणीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. शोभा यात्रेत माजी खासदार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, संजय देरकर, विजय पिदुरकर, दिनकर पावडे, पवन एकरे, सत्यजित ठाकूरवार यासह शहरातील इतर मान्यवर या सह नागरिक हजारो महिला पुरुष भाविक भक्तगण हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की चा जयघोष करीत शोभायात्रेत सहभागी झाले होते.
श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे सल्लागार विजय चोरडिया, सौ. सीमा विजय चोरडिया, समितीचे अध्यक्ष अॅड. कुणाल चोरडिया, सौ. ख्याती कुणाल चोरडिया यांनी शोभायात्रेत सहभागी झालेल्या बालगोपाल व भक्तांची काळजी घेतली. दरम्यान संपूर्ण वणी शहरात शोभायात्रा निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या बंदोबस्तासाठी वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी यांनी स्वतः हजर राहून कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अशा तर्हेने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या हर्षऊल्हासात पार पडला.
धार्मिक वातावरणाने गजबजली वणी नगरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 29, 2024
Rating: