सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रमेश तांबे यांच्या मातोश्री अनुसया नानाजी तांबे (वय ८६) यांचे आज दि. २९ ऑगस्ट ला दुपारी ३.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. उद्या शुक्रवारी ११ वाजता त्यांची महात्मा ज्योतिबा फुले चौक परिसर येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
जेष्ठ पत्रकार रमेश तांबे यांना मातृशोक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 29, 2024
Rating: