केशवनगर ते वेळाबाई रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील केशवनगर-वेळाबाई-मोहदा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या मार्गांवर मोठंमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांचे नागरिकांचे बेहाल होत असल्यामुळे तत्काळ केशव नगर ते वेळाबाई रस्त्याची दुरुस्ती करा, अशा आशयचे निवेदन उपविभागीय अधिकारी,वणी यांना देण्यात आले. सात दिवसात रस्ते दुरुस्त केली नाही तर, सर्व गावकरी मिळून रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करणार,असा ईशाराही देण्यात आला आहे.

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रस्त्याची अधोगती झाली आहे. या गंभीर बाबीकडे मोहदा, वेळाबाई, केशव नगर व आबई येथील गावकरी, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, शेतकरी शेतमजूर, रोज मरण यातना भोगत असल्याचा तीव्र संताप निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. 

या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात अनेकाचे प्राणही गेले आहेत. राज्यमार्गावर गिट्टी व धुळीचे साम्राज्य असल्यानं अनेकांना श्वसनाचा त्रासही होतो.
सदर रस्त्याचं काम थातूर मातुर करून मलिंदा लाटण्याशिवाय काहीच करत नाही, त्यामुळे आम्हा गावाकऱ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरला नसल्याने आज शुक्रवार (ता.१२) ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून तातडीने निवेदनाची सात दिवसात दखल घ्यावी, अन्यथा परिणामांना सामोरे जा, होणाऱ्या आंदोलन दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासन जबादार असेल असे दिलेल्या निवेदनात म्हटलं गेले आहे. 

निवेदनावर सौ.रंजना बांदूरकर सरपंच वेळाबाई, संदीप मेश्राम उपसरपंच वेळाबाई, सचिन रासेकर उपसरपंच मोहदा, सुरेश रासेकर, सुधीर कुळसंगे, कुमार झाडे, नागेश बोबडे, अमोल देवाळकर, श्रीकांत येसेकर, किशोर वडस्कर, यांच्या सह इतरही नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
Previous Post Next Post