सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वनोजा (देवी) येथे गेल्या वर्षभरात अनेक समस्या निर्माण झाल्या असुन त्या सोडविण्यात याव्या अशी मागणी करणारे निवेदन वनोजा ग्राम वासियांनी ग्रामपंचायत कार्यालय वनोजा यांचे कडे देण्यात आले आहे. यावेळी गावातील असंख्य महिला पुरुष हजर होते.
मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) येथे गेल्या अनेक दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद आहे,पाण्याची टाकी स्वच्छ न करणे,टाकी न भरणे,पाणी शुध्दीकरण यंत्र बंद असणे, नळाला नियमीत पाणी न सोडणे, पाणी पुरवठा कर्मचारी नियमीत सेवा देत नाही, खोट्या आरोपाखाली सामान्य नागरिकांना गुंतविणे, नागरिकांची मुस्कटदाबी करणे, ईत्यादी समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे नागरिकांनी सचिव सरपंच यांचे कडे करण्यात आली आहे.
निवेदना वर रोशन शिंदे, प्रशांत बोढे, अतुल गोंडे, संदीप राजूरकर, सुशांत वरपटकर,सुशमा ढोके,हर्शाली क्षीरसागर, गिरिजाबाई राजुरकर,अम्रुता ढोके,सोनू राजुरकर,गिता बोढे, ईत्यादीच्या सह्या आहे.