सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कित्येक वर्षापासून मारेगाव येथील बसस्थानक बांधकाम करण्यासाठी शासन प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी निवेदनातून केला असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या गर्वाने सांगतात की, एसटीचे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक उभे केले असुन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडला, हि आनंदाची बातमी आहे. परंतु मारेगाव तालुक्यात कित्येक वर्षापासून बसस्थानक बांधकाम करण्यासाठी शासन प्रशासन टाळाटाळ करत आहे. याकडे थोडं गांभीर्याने लक्ष द्या, तसे लक्ष वेधण्यासाठी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते देवराव वाटगुरे हे मारेगाव येथील बसस्थानकाच्या राखीव जागेवर आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी डोकावून सुद्धा पहिले नाही. आमदार भाजपा चा तर खासदार काँग्रेस पक्षाचे आहेत. असो आमदार, खासदार, हे मारेगाव बसस्थानकाबाबत सकारात्मक नसल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे जेष्ठ नेते देवराव वाटगुरे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. ज्या पद्धतीने पंढरपुरात एसटीचे पहिले यात्रा बसस्थानक उभे करून त्याचा लोकार्पण सोहळा पार पाडला त्याच धर्तीवर मारेगाव येथील बसस्थानक बांधकाम तात्काळ सुरू करण्यात येऊन लोकार्पण सोहळा आपल्या हस्ते पार पडावा अशी अपेक्षा उपोषणकर्ते व मारेगाव तालुक्यातील नागरिकांची आहे.
शेवटी वणी मतदार संघांचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेतात की, बेदखल करतात याकडे लक्ष लागलेले आहे. जो पर्यंत बसस्थानक बांधकाम करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सादर होणार नाही, तो पर्यंत बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्रा जेष्ठ नेते देवराव वाटगुरे यांनी घेतला असुन शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. त्याकरिता यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पांडुरंग टेकाम, भास्कर टेकाम, संतोष अत्राम, वासुदेव रामपूरे, परसराम धुर्वे, गुलाब सिडाम, नंदकिशोर सिडाम, बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश आत्राम, युवा नेते अजय भाऊ खाडे, विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे हे परिश्रम घेत आहेत.
मुख्यमंत्री साहेब पंढरपूर येथे 'बस स्थानक' उभे केले मारेगावात कधी करता?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 16, 2024
Rating: