टॉप बातम्या

'त्या' खुनातील दोन्ही आरोपींना राळेगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केली अटक

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे 

राळेगाव : दिनांक 5 जून 2024 रोजी सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास छोटु उर्फ नितेश ओंकार यांची हातउसनेवारीच्या वादातून निघृण हत्या करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे पसार झाले होते. पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी भोला उर्फ रवि महाजन व मयुर इंगळे रा. राळेगाव या दोन्ही आरोपींचा पोलिस सर्वत्र शोध घेत असताना आरोपी हे वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे असल्याची गोपीनीय माहीती मिळताच राळेगाव पोलिस पथक सावंगी (मेघे) येथे जाऊन सापळा रचून या दोन्ही आरोपींना अवघ्या 48 तासात अटक करण्यात आली आहे. 

सदर आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून ही कार्यवाई डॉ.पवन बन्सोड जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ, यांच्या आदेशानुसार पियुष जगताप अप्पर पोलिस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली रामेश्वर वेंजणे पोलीस उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, रामकृष्ण जाधव पोलिस निरीक्षक पो.स्टे. राळेगाव, विशाल बोरकर पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक पो.स्टे. नितीन गेडाम, पोलिस, विशाल कोवे‌ नायक पोलिस कास्टेबल यांनी केली.
Previous Post Next Post