वाहन चालकाला अडवून लुटले, मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : पांढरकवडाहून प्रवासी वाहनाचा पाठलाग करुन त्या चालकास लुटल्याबाबतच्या घटनेची मारेगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सलीम सुलतान गिलानी (वय 44) रा. करंजी रोड, असे लुटण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. तर नरेश जयस्वाल (वय 40) रा.यवतमाळ यांचे सह दहा जणाविरोधात 395, 364 (अ ) 326, 323, 342, 504, 506 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संशियीताचे नाव आहे. 
तक्रारकर्त्या चालकाचा पाठलाग करुन मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या खेकडवाई शिवारात वाहन अडवुन त्यांना घोगुलधरा शिवारात नेऊन बेदम मारहाण केली. त्याच्या जवळील मोबाईल मधून जबरदस्तीने स्वतः च्या फोन पे केलेले 18900 व रोख रक्कम 2 हजार रुपये असा एकूण 20,900/ रुपये लुटले. या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपपोलीस निरीक्षक डॉ ज्ञानेश्वर सावंत करीत आहे.
वाहन चालकाला अडवून लुटले, मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना वाहन चालकाला अडवून लुटले, मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2024 Rating: 5
Powered by Blogger.