आरतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने केली लॉकअपमध्ये आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वरोरा : शहरातील आनंदवन येथिल पंचवीस वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (24) रा. चोपडा (जि. जळगाव) ह. मु. वरोरा या आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

वरोरा पोलीस स्टेशनच्या कस्टडी मध्येच आज सकाळी साडे आठ च्या दरम्यान बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आरोपी 4 जुलै पर्यंत सात दिवसाच्या पोलीस कोठडीत होता. स्व. बाबा आमटे यांच्या आनंदवनात आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीची बुधवारी घरात शिरून आरोपीने हत्या केली होती. प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून झाल्याचा संशय होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान याला गुरुवारी संध्याकाळी अटक केली होती. आरोपीने पोलीस स्टेशन च्या कस्टडी मध्ये आत्महत्या केल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत.
 
या आत्महत्या प्रकरणातील बरेच प्रश्न अनुत्तरीत असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. अजून पर्यंत अधिकृतरित्या पत्रकारांना माहिती मिळाली नसून शव विच्छेदनासाठी वरोरा किंवा चंद्रपूर रुग्णालयात शव नेण्यात येणार असल्याचे कळले.
आरतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने केली लॉकअपमध्ये आत्महत्या आरतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने केली लॉकअपमध्ये आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 30, 2024 Rating: 5
Powered by Blogger.