टॉप बातम्या

वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 26 जून च्या सकाळी सहा वाजता अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसिलदार उत्तम निलावाड यांनी पकडून तहसील कार्यालय मारेगाव येथे जमा केले आहे. या कार्यवाहीने वाळू चोरट्या मध्ये चांगलीच धडकी भरली आहे. 

मारेगाव तालुक्यातील आपटी, सावंगी आणि कोसारा येथील शासनाच्या घाटातील रेती 24 जून 2024 पर्यंत डेपोत साठवून, बुकिंग धारकांनाच वाळू देण्याची परवानगी होती. कालावधी संपल्याने महसूलने शिल्लक वाळू (25 जून) ला ताब्यात घेतली. मात्र, बुकिंग च्या नावाखाली काही वाहनधारक एखादी ट्रिप चोरून नेताहेत हे लक्षात येताच आज बुधवारीला सकाळी 6 वाजता सावंगी परिसरातील सावंगी कोसारा या मार्गांवर दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर क्र. (एम एच 34 बी ई 2966) व दुसरे विना नंबरचे ट्रॅक्टर आहे. 

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या उपस्थितीत कार्यवाही नायब तहसीलदार भगत, मंडळ अधिकारी गुघाने तलाठी सोयाम, शिंगणे, वानखेडे, मडावी व मारेगाव तहसीलचे कर्मचारी यांनी केली. तालुक्यातील अवैध वाळू चोरट्यावर कारवाई सह वाहन जप्ती सातत्याने सुरु राहणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. 
Previous Post Next Post