महसूल सहायक प्रविण पोहरकर एसीबी च्या जाळ्यात, तीस हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : हिवरा येथील पांडूरंग सखाराम आंडगे या शेतकर्‍याचे पांदण रस्ता खूला करुन देण्याचे प्रकरण गेल्या तिन वर्षापासून सुरु असून शेतकरी आंडगे यांनी न्याय मागण्यासाठी पाच वेळा उपोषण केले.परंतू महागाव तहसील व जिल्हा प्रशासनाने सातत्याने घोर निराशा करत शेतकरी आंडगे यांना न्याय तर दिलाच नाही परंतू महसूल खात्याला काळीमा फासणारा महसूल सहायक याने दि.२१जुन रोजी चाळीस हजार रुपयाची लाच मागीतली.
       
आधीच शेतरस्त्याच्या त्रासामुळे मेटाकूटीस आलेला शेतकरी पांडूरंग आंडगे यांनी थेट एसीबी कार्यालय गाठले आणि अनेक दिवसापासून भ्रष्टाचार करणार्‍या महसूल सहायक प्रविण पोहरकर याला तिस हजाराची लाच स्विकारतांना रंगेहात पकडून देवून चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे तहसील प्रशासनात खळबळ उडाली आहे.आज उशीरापर्यंत आरोपी प्रविण पोहरकर याची चौकशी सुरु होती. पोलीस उपअधिक्षक यवतमाळ उत्तम नामवाडे यांच्या टीमने सापळा रचून ही कारवाई पार पाडली.
Previous Post Next Post