मारेगाव येथे भाजपाची कार्यकर्ता संवाद बैठक


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : देशातील लोकसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालानंतर भारतीय जनता पक्ष हाच एकमेव मोठा पक्ष ठरला असून देखील महाराष्ट्रात मात्र, भाजपाला पाहिजेत तसं यश प्राप्त करता आले नाही. याच चिंतन म्हणून वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मारेगाव (रोड) येथील स्थानिक सभागृह शेतकरी सुविधा केंद्रा मध्ये मंगळवार (ता.11) रोजी दुपारी 1 ते 4 या काळात कार्यकर्ता संवाद बैठक पार पडली. 

संवाद बैठकीला तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, जेष्ठ नेते महामंत्री मंगेश देशपांडे, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे तालुका सरचिटणीस, युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश झाडे, पवन ढवस, शशिकांत आंबटकर, माधव कोहळे सर, सरपंच अभिजित मांडेकर, चंदू जवादे, श्रीकांत गौरकर, मारोती तुराणकर, दादाराव ढोबरे, चंद्रकांत धोबे, सुरेश लांडे, महिला पदाधिकारी शालिनी दारुंडे, सुनीता मांढरे, माला गौरकार, सुनीता जुमनाके सरपंच, यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पक्षाच्या सहविचार बैठकीला सुरुवात झाली. या प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पदाधिकारी कार्यकर्ता यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. नुकत्याच झालेल्या चंद्रपूर लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या अपयशाची स्वतः जबाबदारी स्वीकारत विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा खुरपूस समाचार घेतला. देशाला, विकासाला केंद्रस्थानी बघणारी भारतीय जनता पार्टी आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही विकासात्मक काम करतोय,त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला सुज्ञ नागरिकांनी बळी पडू नये, लोकशाही मार्गाने काम करत असताना अनेक अडचणी येतात मात्र, यापुढे जोमाने भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा काम करणार आहेत, असा विश्वास आमदार यांनी व्यक्त केला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांना दुर्लक्षित करून जनतेला कामकाजाबाबत पटवून सांगण्याचं आवाहन केल. येणारी विधानसभा ही निश्चितच सर्वांच्या सहकार्याने आपण मोठ्या मताधिक्याने जिंकू, यात शंका नसावी. आमदार बोदकुरवार यांनी विरोधकांवर प्रहार करत मी आणि माझा पक्ष जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे आगामी विधानसभेकरिता आतापासूनच सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी कार्यक्षेत्रात कामाला लागावे असे पक्ष फर्मान सोडले. तसेच या बैठकीला इतरही उपस्थित मान्यवरांनी आपापले मते विचार मांडून लोकसभा मतदार संघात मिळालेलं सर्वांना मोठं अपयश आहे. याकडे दुर्लक्ष करून चालताकामा नये. त्यासाठी कोणावरही न जबाबदारी न ढकलता आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या असल्याचे सांगण्यात आले. 

या बैठकीला सर्व प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, महिला आघाडी तालुक्याची कार्यकारणी, मंडळाचे सर्व आघाड्याची कार्यकारणी, पंचायत समिती प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वोअरियर,सर्व नगरसेवक, सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी सरपंच-उपसरपंच,सर्व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नगरसेवक वैभव पवार, प्रास्ताविक अविनाश लांबट यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन ढवस यांनी मानले.
मारेगाव येथे भाजपाची कार्यकर्ता संवाद बैठक मारेगाव येथे भाजपाची कार्यकर्ता संवाद बैठक Reviewed by सह्याद्री चौफेर on June 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.