इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कोसारा (सोईट) येथे चंद्रकांत रामराव आष्टेकर वृद्धाश्रमात तीन महिन्यांपासून कामावर असलेल्या राजेश पांडुरंग दुरभादे (अंदाजे वय ५२) रा.ठेंभा त.हिंगणघाट जि.वर्धा याने बुधवारच्या रात्री बाहेर झोपुन असतांना दोन वाजताच्या दरम्यान मागच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांना देण्यात आली. पोलिस स्टेशनचे ठाणेदार हे आपले सहकारी टीम घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
इसमाची गळफास घेऊन आत्महत्या  इसमाची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 13, 2024 Rating: 5
Powered by Blogger.