राळेगाव येथे धारधार शस्त्राने वार करून छोटु ओंकार याची हत्या

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : येथील बसस्टॉप समोर अगदी वर्दळीच्या ठिकाणी दिनांक ५ जून रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान, येथीलच छोटु उर्फ नितेश ओंकार (अंदाजे वय ३८) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून आरोपी पसार झाले. या घटनेने राळेगावात एकच खळबळ उडाली. 
सदर घटनेची माहिती ठाणेदार रामकृष्ण जाधव यांना मिळताच तातडीने आपल्या पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इसमाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव व तेथून जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले असता, यवतमाळ येथे जात असतांना वाटेतच मृत्यू झाला. सदर मृतदेह शवविच्छेदनाकरीता जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून ओंकार च्या हल्लेखोरांचा सर्वत्र शोध घेणे सुरू आहे. 
रवि उर्फ भोला महाजन आणि त्याचा साथीदार मयूर इंगळे असे या दोन हल्लेखोर आरोपिंचे नाव असून उसनेवारी पैश्याच्या कारणावरून त्याची हत्या झाल्याची पोलीस सूत्रांनी माहिती दिली.
राळेगाव येथे धारधार शस्त्राने वार करून छोटु ओंकार याची हत्या राळेगाव येथे धारधार शस्त्राने वार करून छोटु ओंकार याची हत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on June 06, 2024 Rating: 5
Powered by Blogger.