अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहासाठी अर्ज आमंत्रित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता प्रकल्पांतर्गत मुला, मुलींचे वसतीगृह कार्यरत असून ईच्छूक विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

प्रकल्पांतर्गत मुलींचे ९ व मुलांचे १० असे एकुन १९ वसतीगृह कार्यरत असून या शैक्षणिक सत्राकरीता आदिवासी मुला, मुलींचे वसतीगृहात प्रवेशाकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात येणार आहे. पांढरकवडा प्रकल्पातील जिल्हास्तरावरील कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता आणि तालुकास्तरीय वसतीगृहामध्ये इयत्ता ८ वी ते कनिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमाकरीता जुन्या, नवीन विद्यार्थ्यांनी दि.२७ जुन पर्यंत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेशाची प्रक्रिया गुणवत्ता तथा नियमानुसार करण्यात येईल वसतीगृहात रिक्त जागेच्या अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करतांना विहित मुदतीत आवश्यक मुळ कागदपत्रे अपलोड करावेत. संकेतस्थळावर आपला युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून ऑनलाईन अर्ज New हा पर्याय निवडून भरावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, सन २०२३-२४ चा पालकाचा उत्पन्नाचा दाखला, महाविद्यालयात, विद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, आधारकार्ड, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक छायांकित प्रत, इयता १० वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी प्रमाणपत्र अर्जासोबत ऑनलाईन अपलोड करुन सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधित वसतीगृहाच्या गृहपालांकडे सादर करावी.

वसतीगृहातील जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज Renew हा पर्याय निवडून अर्ज भरावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी कळविले आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहासाठी अर्ज आमंत्रित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता वसतीगृहासाठी अर्ज आमंत्रित Reviewed by सह्याद्री चौफेर on June 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.