सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
रोजगार सेवकांना वरिष्ठांकडे सादरीकरण किंवा मंत्रीस्तरावर डेटा पोहोचवण्यासाठी या कागदपत्रांचे वर्गीकरण करावे लागते. तक्ते तयार करावे लागतात. आकडेमोडही असतेच. भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि रोहयोचे अत्यंत जवळचे नाते असल्याने कामांचे वारंवार फोटो काढावे लागतात. मजुरांचेही फोटो काढून ते अपडेट करावे लागतात. ही सारी कामे मोबाईलवर करणे किचकट, जिकिरीचे असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यात वस्तुस्थिती असल्याचे लक्षात आल्यावर सरकार जागृत झाले आहे.
आजकाल कागदपत्रे सांभाळणे म्हणजे मोठे आव्हान झाले आहे. रोजगार हमी योजनेतील रोजगार सेवकांना रस्ते, विहिरी आणि इतर कामांची बिले सांभाळावी लागतात. त्यामुळे त्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी रोहयोमंत्री यांनी पुढाकार घेतला आहे. रोहयो खाते अपडेट करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असून सर्व कामे ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायत पैकी उपस्थित रोजगार सेवकांना आज गुरुवार दि.13 जून ला टॅब चे वितरण करण्यात आले.
यावेळी रोजगार हमी विभागाचे एपिओ, तांत्रिक अधिकारी, पीटीओ, सिडिओपी डेटा ऑपरेटर, तथा पंचायत समिती अधिकारी व तहसील कार्यालयाचे संबंधित कर्मचारी यांच्या सह तालुक्यातील ग्रामीण रोजगार सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
रोजगार सेवकांना मिळाले ‘टॅब’ ; ग्रामीण भागातील शासकीय कामकाजाची वाढणार गती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2024
Rating: